मंगलाचरण अभंग
१.प्रथम नमन करूं गणनाथा । उमाशंकराचिया सुता । चरणावरी ठेवूनि माथा । साष्टांगी आतां दंडवत ॥१॥ दुसरी वंदूं सारजा । जे चतुराननाची आत्मजा । वाक्सिध्दि पाविजे सहजा । तिच्या चरणवोजा दंडवत ॥२॥ आतां वंदूं देवब्राह्मण । ज्याचेनि पुण्यपावन । प्रसन्न होऊनि श्रोतेजन । त्यां माझें नमन दंडवत ॥३॥ आता वंदुं साधु सज्जन । रात्रंदिवस हरीचें ध्यान । विठ्ठल नाम उच्चारिती जन । त्यां माझें नमन दंडवत ॥४॥ आता नमूं रंगभूमिका । कीर्तनीं उभे होती लोकां । टाळ मृदंग श्रोते देखा । त्यां माझें दंडवत ॥५॥ ऐसें नमन करोनि सकळां । हरिकथा बोले बोबड्या बोला । अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा । चालवी सकळां नामा म्हणे ॥६॥ |
| Send
Your Feedback |
॥ श्री संत नामदेव महाराज यांची अभंगाची गाथा ॥ |
|
|
|