|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| २. |
प्रथम
नमू गजवदनु । गौरीहराचा नंदनु सकळ सुरवरांचा वंदनु । मूषकवाहनु नमियेला
॥१॥ त्रिपुरावधीं गणाधिपति । हरें पूजिला भावें भक्ति । ऎके बाणें त्रिपूरा
पाडिला क्षितीं । तैं पशुपति संतोषला ॥२॥ इंद्रादिकीं अष्टलोकपाळीं ।
लंबोदरु पुजिला कनककमळीं । त्यासी प्रसन्न झाला तयेवेळीं । म्हणवूनि
सकळीं पूजियेला ॥३॥ सटवें रात्रीं मदनु शंभरें नेला । प्रद्युन्न समुद्रामाजीं
टाकिला । तैं कृष्णें विघ्नहरु पूजिला । प्रद्युन्न आला रतीसहित ॥४॥
पूजिला साही चक्रवर्ति । त्यांचिया पुरतीआर्ती । युधिष्ठरें पूजिला चतुर्थी
। राज्यप्राप्ति झाली तया ॥५॥ म्हणवूनि सुरवरीं केली पूजा । त्रिभुवनीं
आणिक नाहीं दुजा । विष्णुदास नामा म्हणे स्वामी माझा । भावें भजा एकदंता
॥६॥ |
|
|