| |
संत
नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
|
|
|
|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| ५३. |
कंसे पाठविला तेव्हां तृणावर्त । धुळीनें समस्त व्यापियेलें ॥१॥ दुष्ठबुध्दी
तेव्हां उचली देवासी । धरियेलें त्यासी कंठी देवें ॥२॥ यशोदा पहात न
दिसे श्रीकृष्ण । ऊर बडवुन शोक करी ॥३॥ गौळणीचा मेळा मिळाला समस्ता ।
कोणी कृष्णनाथा नेला सये ॥४॥ न लगे घरदार बुडाला संसार । दावा ग श्रीधर
तान्हें माझें ॥५॥ ठावें असतें ऐसें बांधिते पोटासी । कोठें गुतंलासी
बाळा माझ्या ॥६॥ धांवा गे धांवा पाहा गे लेंकरुं । शोक अनिवारु करीतसे
॥७॥ शिणल्या भागल्या येतों तुझ्या घरा । मुख हें उदारा दावीं कृष्णा
॥८॥ सोडूं पाहे प्राणा यशोदा सुंदरी । हंबरडा फोडी कृष्णालागीं ॥९॥ चेपोनि
नरडी गतप्राण केला । भूमीसी पाडिला दैत्य तेव्हां ॥१०॥ नामा म्हणे वरी
खेळत गोविंद । पाहोनि आनंद सकळांसी ॥११॥
|
|
|
| |
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 |
|