| |
संत
नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
|
|
|
|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| ८१. |
नंदाचिये घरी चंपाषष्ठी नेम । कुळीं कुळधर्म मार्तंडाचा ॥१॥ पकान्नेंही नाना रोटिया भरीत । केलीं अपरमित यशोदेने ॥२॥ वाघियामुर्ळी सांगितली दोन्ही । आला चक्रपणी खेळतची ॥३॥ मातेलागीं म्हणे लागलीसे क्षुधा । थांब रे गोविंदा म्हणे माता ॥४॥ घेतलीसे आळी करी लगबग । विस्तारलें सांग नैवेद्यासी ॥५॥ नेऊनियां पुढें देवांच्या ठेविले । बोलवा वहिले आमंत्रिक ॥६॥ तों वरी मागें तो भक्षी नारायण । यशोदा आपण रागावली ॥७॥ दुरळ हा देव होय आतां कैसें । मार्तंडाचे पिसें लागे तुज ॥८॥ करी क्षणामाजीं वांकडेंचि मुख । हरी खात वीख कालवलें ॥९॥ जाणीतला भाव मायेचें अंतर । करूनियां खरें दावी देव ॥१०॥ वांकडियां हातें ग्रास घाली मुखें । मुख तेंहि सुखें तैसें दावी ॥११॥ पिसाळल्यापरी करी वेडेचार । भय वाटे फार मायेलागीं ॥१२॥ पूर्वी म्यां सांगता नायकसी कैसा । पुढें हा वळसा वोढवला ॥१३॥ आले देवऋषि हालवितां सुपें । त्यांचिया न बापें देव निघे ॥१४॥ वासोनियां डोळे तयाकडे पाहे । कांपे तया भये थरथरां ॥१५॥ मंत्रूनिया पाणी आणिला अंगारा । तयाचा मातेरा केला देवें ॥१६॥ नवसा न पावती गोकुळींच्या देवता । उपाय मागुता राहिलासे ॥१७॥ चिंतावली माय मुर्च्छा आली तिसी । झाली पोरपिसी मोहजाळें ॥१८॥ जाणोनी अंतर म्हणे कृष्णार्पण । तेव्हां आलें विघ्न दूर होय ॥१९॥ नामा म्हणे देव पाहे कृपादृष्टी । जाणवलें पोटी हाचि देव ॥२०॥
|
|
|
| |
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 |
|