| |
संत
नामदेव महाराज यांची अभंगांची गाथा
|
|
|
|
| |
भाग
पहिला - मंगलाचरण अभंग |
| ८४. |
मंदिरा नेऊनि पलंगी बैसविला । म्हणत हरीला तयेवेळीं ॥१॥ ऐशिया समयीं थोर तूं अससी । तरी हृषीकेशी बरें होते ॥२॥ देखोनि भाव तिचा थोर झाला हरी । पाहूनि सुंदरा आनंदली ॥३॥ सुखशयनी राधा एकान्तीं असतां । अनया अवचितां आला तेथें ॥४॥ सक्रोध होऊनि बोलला राधेसी । कोणसी बोलसी गुजगोष्टी ॥५॥ भ्रताराचा शब्दा ऐकतां श्रवणीं । दचकली मनीं राधिका ते ॥६॥ हात जोडोनियां विनवीत हरीसी । होई हृषीकेशी सान आतां ॥७॥ ऐकोनि करुणा बाळ झाला हरी । दहीभात झडकरी ठेवी पुढें ॥८॥ कवाड उघडून बोलत अनयासी । घरांत हृषीकेशी जेवितसे ॥९॥ कावड ठेवूनि घरांत तो आला । जेवितां देखिला कृष्णनाथ ॥१०॥ नामा म्हणे अनया आनंदला मनीं । हृदयीं चक्रपाणी धरियेला ॥११॥
|
|
|
| |
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 |
|